भुसावळात भल्या पहाटे दुध डेअरीसह मेडिकल फोडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
 
भुसावळात भल्या पहाटे दुध डेअरीसह मेडिकल फोडले
रोकड लंपास
भुसावळ, २० मे
जामनेर रोडवरील अष्टभूजा डेअरी व मेडिकल दुकानात चोरट्यांनी २० रोजी भल्या पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास हातसाफ करत रोकड लांबवली .
जामनेर रोडवर सामाजिक कार्यकर्ता नितीन धांडे यांची अष्टभूजा डेअरी आहे. नितीन धांडे यांच्या पत्नी या भुसावळ नगर पालिकेत नगरसेविका आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चारचाकी एम.एच.१५ ए.पी.११२२ वाहनातून आलेल्या चार चोरट्यांनी रस्त्यावरच वाहन उभे करून डेअरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील सहा हजारांची रोकड लांबवली तर शेजारीच असलेल्या डॉ.विनायक महाजन यांचे मेडिकल दुकान फोडून सुमारे तीन हजारांची रोकड लांबवली. चार वाजेच्या सुमारास धांडे यांच्या दुकानासमोरील इसमाला डेअरीचे शटर अर्धे उघडे दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. मेडीकल मधील रोकड चोरट्यांनी लांबवली परंतु चिल्लर सोडून दिली.
भल्या पहाटे आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@