बाबा बोहरी खून प्रकरणी दोन संशयीत स्था.गुन्हे शाखेच्या जाळ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
बाबा बोहरी खून प्रकरणी दोन संशयीत स्था.गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव, २० मे
अमळनेर शहरातील बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी ५४, न्यू प्लॉट, अमळनेर यांच्या खुनातील दोन संशीत आरोपी जळगाव स्था.गु.शाखेने ताब्यात घेतले आहे.
या खुनात राज चव्हाण या संशयीताचे नाव पुढे आले होते मात्र या गुन्ह्यात दुसरेच संशयीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.स्था.गु.शाखेचे पो.नि. सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमधून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे संशयीत पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.पैशांसाठीच हा खून झाला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अशी घडली होती घटना
गुरुवार, ३ मे रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी पंपावरून हिशोब करून घराकडे निघालेल्या बाबा बोहरी यांच्यावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार मारेकर्‍यातील एकाने जवळून गोळी झाडली तर छातीच्या डाव्या बरगडीत ही गोळी शिरल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, तत्पूर्वी जखमी अवस्थेत बोहरी यांनी दुचाकी चालवून पेट्रोल पंप गाठत कर्मचार्‍यांना पाणी मागितले व आपल्याला गोळी लागल्याचे सांगितले होते. जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला होता.
@@AUTHORINFO_V1@@