जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचीउपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
 
 
जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांची
उपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ
 
जळगाव, १९ मे
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा अपूर्ण योजनेची चौकशी समिती नेमून सखोल चौकशी पुर्नमुल्यांकन आणि चौकशी करुन दोषी आढळणार्‍यांवर ठेकेदार, सचिव, पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य शुक्रवारपासून आमरण उपोषणाला बसलेे आहेत.
शनिवारी, १९ रोजी दुसर्‍या दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली.
लेखी आश्वासनानंतर निर्णय जोपर्यंत सीईओ शिवाजी दिवेकर यांचे लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
पहिल्या दिवशी शुक्रवार रोजी जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य लालचंद पाटील, मधुकर काटे, जे.के.चव्हाण यांनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती. दुसर्‍या दिवशी शनिवारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी चर्चा करुन काहीच निष्पन्न झाले नाही.
भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार अर्ज केलेला होता. त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने स्मरणपत्र पुन्हा दिले. त्यानंतरही सीईओ यांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याने आमरण उपोषण करावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@