दंतेवाडा येथे पोलिसांच्या गाडीवर नक्षलवादी हल्ला, ६ जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
छत्तीसगड : दंतेवाडा येथे चोलनर गावात नक्षलवाद्यांनी पोलीस दलाच्या वाहनावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १ जवान जखमी झाला आहे, जखमी जवानांना उपचारासाठी त्वरित राजधानी रायपुर येथे पाठविण्यात आले आहे. 
 
 
 
 
 
शहीद झालेल्या ५ जवानांमध्ये सैन्य दलाच्या ३ तर २ जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी आईईडी बॉम्ब लावून हल्ला केला. याबाबत आणखी माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र आणखी नक्षलवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
दंतेवाडा हा छत्तीसगत्र येथील सगळ्यात मोठा नक्षलीभाग मानल्या जातो. याआधी देखील या भागाल नक्षली हल्ले झालेले आहेत, आणि त्यामुळे अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@