भुजबळांची 'ट्विटर इंट्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |


तब्बल सव्वा दोन वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रावादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ हे आता पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय होत असल्याचे दिसू लागले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता भुजबळ यांचे ट्विटर देखील आगमन झाले असून आज त्यांनी आपले नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. आपल्या अकाऊंटवरून आज त्यांनी पहिले ट्वीट केले असून आपली सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपले पहिले ट्वीट केले आहे.

आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आपण लवकरच येणार आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. सध्या आपल्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु हे उपचार संपल्यानंतर कार्यकत्त्यांच्या भेटी सुरु करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.




दरम्यान भुजबळ यांच्या या ट्वीटला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. भुजबळ यांच्या या ट्वीटवर त्यांच्या अनेक समर्थकांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या कार्यासाठी सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@