पाकिस्तानच्या अणुचाचणी विरोधात बलोच कार्यकार्यकत्यांचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |


लंडन : १९९८ मधील आपल्या अणु चाचणीच्या यशानिमित्त पाकिस्तानकडून २८ मे ला साजरा करण्यात येणाऱ्या 'योम-ए-तकबीर' या राष्ट्रीय अणु परीक्षण दिनाविरोधात बलोच नागरिकांकडून जगव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या 'फ्री बलुचिस्तान मुव्हमेंट' या संघटनेनी जगभरातील सर्व बलुच नागरिकांना याविषयी आवाहन केले असून येत्या २८ तारखेला पाकिस्तान विरोधात सर्व नागरिकांनी आपापल्या देशातील पाक दूतावासाबाहेर याविरोधात आंदोलन करावे, असे आवाहन या संघटनेनी केले आहे.

संघटनेच्या माहितीनुसार अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, नॉर्वे, स्वित्झर्लंड या प्रमुख देशांसह जगभरात ज्याज्या ठिकाणी बलोच नागरिक वास्तव्यासाठी आहेत, त्याठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. याचबरोबर पाकिस्तानच्या घातक विचारांविरोधात आणि अणु बॉम्बच्या वापराविरोधात सोशल मिडीयावर #NoToPakistaniNukes ही मोहीम देखील सुरु करण्यात येणार असल्याचे या संघटनेनी म्हटले आहे. या मोहिमेमार्फत पाकिस्तानच्या या चाचणीमुळे बलुचिस्तानची झालेली दुर्दशा आणि तेथील नागरिकांच्या परिस्थितीविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे या संघटनेनी सांगितले आहे.

भारताने पोकर्ण येथे यशस्वी अणु चाचणी घेतल्यानंतर काही दिवसाच्या अंतराने पाकिस्तानने २८ मे १९९८ मध्ये चीनच्या मदतीने बलुचिस्तान येथे एक अणुचाचणी घेतली होती. परंतु चाचणी दरम्यान कसल्याही प्रकारची काळजी न घेतली गेल्यामुळे याचा बलुचिस्तानमधील पर्यावरणावर आणि नागरिकांवर अत्यंत वाईट परिणाम झाला होता. यामुळे काही नागरिकांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता. त्यामुळे प्रत्येक वर्षी बलोच नागरिकांकडून २८ मे दिवशी पाकिस्तानच्या या चाचणीविरोधात निदर्शने केली जातात.
@@AUTHORINFO_V1@@