जनमत सिद्धारामैय्यांच्या विरोधात होते हे काँग्रेसने विसरू नये : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : काँग्रेस येथे काल येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष आनंदोत्सव साजरा करतोय मात्र जनमत हे सिद्धारामैय्यांच्या विरोधात होतं हे त्यांनी विसरून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. काल माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ही आघाडी आणि ही युती फारकाळ टिकू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
"जर कोणाला पराभवातही विजय दिसत असेल, तर त्यांना कोण थांबवू शकेल ? भाजपने आधीच कर्नाटक निवडणूक जिंकली आहे व लोकांनी काँग्रेसला घालवणारे जनमत दिले आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
जनतेनी पक्षाला नाकारल्यानंतर देखील उत्सव साजरा करण्याची परंपरा राहुल गाँधी यांनी सुरू केली आहे. त्यांचा पक्ष हरला तरी त्यात विजय शोधण्याचा नवीन सिद्धांत गांधींनी मांडला आहे. ते नऊ लोकसभा पोटनिवडणुकीत जिंकले आणि त्यांनी त्याचा विजय साजरा केला. परंतु आम्ही त्यांच्याकडून ११ राज्ये हिरावून घेतल्याचे ते विसरले, असेही ते म्हणाले.
आम्हाला कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा भोंगळ कारभार उघड करायचा होता आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. आम्ही आमदारांनी लाच देण्याचा प्रयत्न केला असता तर आज अशी परिस्थिती नसती, असेही शाह यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@