महावितरणमध्ये गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
महावितरणमध्ये गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा 
जळगाव, २ मे
जळगांव परिमंडळ महावितरणच्या मंडळ, विभाग, उपविभाग व कक्ष कार्यालय या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचार्‍यांनी तत्पर व दर्जेदार ग्राहकसेवेसाठी दैनंदिन कामाचे नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने पुर्ण कार्यक्षमतेने समन्वयातून, सुसंघटीतपणे आपली कामगिरी बजाविल्यास प्रगती अटळ आहे, असा कानमंत्र मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी कामगार दिनी दिला. तत्पुर्वी महाराष्ट्र दिनी मुख्य अभियंता यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महावितरण व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा लघु प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे संपन्न झाला. यावेळी मंचावर कार्यकारी अभियंता संजय तडवी, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, समुपदेशक रागीब अहमद, प्रसिध्द गायक व अभिनेता संघपाल तायडे, योगशिक्षक सागर साळी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कामगार कल्याण केंद्रप्रमुख मिलिंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरणने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ६७ कर्मचार्‍यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले. कर्मचार्‍यांसह निबंध स्पर्धा विजेते व उच्चशिक्षिण घेतलेल्या पाच कामगार पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विविध आस्थापनातील तीन कामगांराना पुरस्कृत केले. त्यात अनिल पाटील (यंत्रचालक- महावितरण), उल्हास महाजन (सुप्रिम कंपनी गाडेगाव) व जयंत खाचने (बॉश कंपनी) यांचा समावेश आहे. महावितरणने सर्व संघटना प्रतिनिधींचा सत्कार केला.
या प्रसंगी पुढे बोलताना जनवीर यांनी महावितरण मोबाईल पचा प्रभावी वापर, मीटर रिंडींग व बिलींग ,थकबाकी वसुली, वीज चोरी या विषयावर त्यांनी भाष्य केले. शुन्य वीज अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचार्‍यांनी सुरक्षेबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले.
विशेष उपक्रम
माझा संकल्प, माझे महावितरण, माझे योगदान हा विशेष उपक्रम यावेळी राबविण्यात आला. पुरस्कारप्राप्त कर्मचार्‍यांनी पुढील वर्षात महावितरणच्या प्रगतीसाठी काय योगदान देणार हे संकल्प फलकावर नाव व स्वाक्षरीसह लिहिले. त्यात कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट ग्राहकसेवा, वीजचोरी रोखेन, मोबाईल पचा वापर करेन, मोबाईल क्रमांकाची नोंदणी पुर्ण करेन, प्रमाणिकपणे सेवा देईन, वीज बिल वसुली पुर्ण करेन, नवीन विद्युत सहाय्यकांना प्रशिक्षण देईन, यंत्रचालकपदाची जबाबदारी सांभाळून वीज बिल वसुलीस वेळ देईन, ग्राहकांचे प्रबोधन करेन, ग्राहक तक्रार निवारण, काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करेन, ग्राहकांचे मीटर रिडींग अचुक घेईन आदी संकल्प घेतले.
प्रास्ताविक अरूण शेलकर,आभार जागृती मोरे तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@