फुले व्यापार संकुलातील १५ गाळे सील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
फुले व्यापार संकुलातील १५ गाळे सील
जळगाव, २ मे
महापालिका प्रशासनाने २ रोजी शहरातील अत्यंत वर्दळीच्या फुले व सेंट्ल फुले मार्केटमधील १५ गाळ्यांना सील लावले आहे.या कारवाईमुळे किरकोळ स्वरुपाचा वाद झाला होता.
मनपाकडून सहकारी सोसायटी यांना ८१ ब नुसार आदेश बजावण्यात आला होता. या आदेशाविरूध्द सहकारी सोसायटी यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. परंतु, हा दावा २६ एप्रिल रोजी फेटळल्याने महापालिका प्रशासनाने बुधवार रोजी सोसायटींचे १५ गाळे सील केले.
ही गाळे झाले सील
यात सेेंट्रल फुले मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील चेअरमन ज.जि. सह नोकारांची पतपेढी गाळा क्र. ३३, ३४, महिला विकास नागरी सहकारी पतपेढी गाळा क्र. ८०, ८१ सिध्दी व्यंकटेश अर्बन को-ऑप सोयायटी १२८, १२९, १३०, गुजराथी अर्बन को-ऑप सोसायटी १८०, १८१, १८२ तर दुसर्‍या मजल्यावरील महाराणा प्रताप नागरी सह. पतपेढी गाळा क्र. ४ तर संत हरदासराम नागरी सह. पतपेढी गाळा क्र. ६ यांच्यासह राम मनोहर लोहीया नागरी पतपेढीचे गाळा क्र. १६८ असे १५ गाळे सील करण्यात आले.
ही कार्यवाही उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, प्रभाग समिती. १ चे प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्यासह १०० कर्मचार्‍यांनी केली.
. गाळे सील करण्याची कारवाई सुरू असल्याचे कळताच गाळेधारकांचे नेते डॉ. शांताराम सोनवणे यांनी सेंट्रल फुले मार्केटमध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. सोनवणे यांनी उपायुक्त कहार यांची भेट घेवून चर्चा केली. डॉ. सोनवणे यांच्या आवाहनानंतर तत्काळ महापालिका मालकीचे सर्व १८ गाळे तात्पुरते स्वरूपात बंद करण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@