संभाजी भिडे यांना अटक व्हावी यासाठी मंत्रालयासमोर आत्म दहनाचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |


मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी एका तरुणाने आज मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करत एका तरुणाने स्वत:वर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
"कोरेगाव-भीमा दंगलीचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अजूनही अटक होत नाही. भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी." असे म्हणत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील गणेश पवार यांनी दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश पवार हा रीपब्लीकन सेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@