अहो आश्चर्यम! जीएसटीची वसुली गेली लाख कोटींच्या घरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 

 
 
अहो आश्चर्यम! जीएसटीची वसुली गेली लाख कोटींच्या घरात
 
 
सध्यातरी तेजीच्या बैलांची मगेल्या काही महिन्यांपासून वस्तू आणि सेवा करा(जीएसटी)ची वसुली घटली असल्याच्या पार्श्‍वभूमिवर केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण गेल्या मार्चअखेरीस जीएसटीची वसुली एक लाख कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या जुलैपासून जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर प्रारंभी या कराची वसुली ९० हजार कोटींच्या आसपास झालेली असली तरी जुलैनंतर जीएसटी वसुलीत घट होऊ लागल्याने ती एक लाख कोटींच्या आसपासही जाऊ शकली नव्हती.
आता गेल्या मार्चमध्ये जीएसटीने लाख कोटी रुपये वसुलीचा टप्पा ओलांडला आहे. हा सरकारच्या दृष्टिने एक सुखद आश्चर्याचा धक्काच म्हटला पाहिजे. आता सरकारचे लक्ष एप्रिलमधील वसुलीकडे वेधले आहे.
एप्रिलमध्ये ई-वे बिल प्रणाली लागू केल्यानंतर जीएसटी वसुलीत आणखी वाढीची शक्यता आहे. सरासरी मासिक वसुलीचे लक्ष्य १ लाख १२ हजार कोटी रुपये इतके ठरविण्यात आले आहे. गेल्या ऑगस्ट २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ७ कोटी १९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात मार्चच्या तिसर्‍या आठवड्याचे आकडे समाविष्ट आहेत. तसेच १ कोटी १९ लाख रुपये सीजीएसटी, १ लाख ७२ हजार कोटी रु. एसजीएसटी व आयजीएसटीचे ३ कोटी ६६ लाख कोटी रु. समाविष्ट आहेत.
देशातील सर्व विमानतळांवरील ड्युटी फ्री शॉप्समधील सामान खरेदी करण्यासाठी आता आपला खिसा थोडा खाली करावा लागणार आहे. कारण या विमानतळांवरील ड्युटी फ्री शॉपमधील वस्तूंची खरेदी करणार्‍या प्रवाशांच्या सामानावर जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटी लागू होण्याआधी या ड्युटी फ्री शॉपमधील विक्री निर्यात मानली जात असल्याने ती केंद्रीय विक्रीकर व व्हॅटपासून मुक्त होती. पण ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंग(एएआर)ने स्पष्ट केल्यानुसार सीजीएसटी कायदा व सीमा शुल्क अधिनियम १९६२ अंतर्गत ड्युटी फ्री शॉप देशाच्या आतच आहेत व प्रवाशांनी या ठिकाणी खरेदी केलेले सामान देशाच्या बाहेरही नेले जात नाही. त्यामुळे प्रवाशांनी खरेदी केलेल्या सामानावर जीएसटी द्यावाच लागणार आहे. हा नियम भारतात येण्याच्या वेळी खरेदी केलेल्या सामानावरच लागू होईल.
दिल्ली विमानतळावरील एका रिटेल आऊटलेटचे संचालन करणार्‍या कंपनीच्या याचिकेच्या आधारावर हा निर्णय एएआरने दिलेला आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधात तेथील ड्युटी फ्री शॉपचे मालक अपीलेट ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंगकडे अपील करु शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार जीएसटी लागू केल्यास ड्युटी फ्री शॉप व बाहेरची दुकाने यातील किंमतीत फारसा फरकच राहणार नाही. त्यामुळे ड्युटी फ्री शॉपच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
सरकारने ऑक्सिटोसिनच्या गैरवापरास आळा घालण्याचे ठरविले आहे. आता कोणतीही खाजगी कंपनी तिचे उत्पादन करु शकणार नाही. फक्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच त्याचे उत्पादन करु शकतील. ऑक्सिटोसिनचा वापर दुभत्या जनावरांचे दुध उत्पादन वाढविण्यासाठी केला जात असतो. याशिवाय टरबूज व खरबूज यासारखी फळे पिकविण्यासाठीही ऑक्सिटोसिन वापरले जाते.
एवढेच नाही तर ऑक्सिटोसिनचा वापर अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेले (ड्रग ऍडिक्ट) लोक नशा आणण्यासाठीही करीत असतात. ऑक्सिटोसिनच्या अतिवापराने कॅन्सर व हार्मोन असंतुलनासारखे गंभीर विकार होत असतात. देशातील सुमारे सव्वाशे कंपन्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन करीत असतात. ऑक्सिटोसिनचा दरवर्षी व्यापार ५० ते ७० कोटी रुपयांपर्यंत होत असतो. अनेक बड्या औषध कंपन्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन करीत असतात.
सद्य आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ ७.२७ टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकते. विख्यात क्रेडिट रेटिंग (पतमानांकन) कंपनी फिचने म्हटल्यानुसार नोटबंदी व जीएसटीमुळे भारताची अर्थव्यवस्था थोडी संथ झाली होती. फिचच्या म्हणण्यानुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षात जीएसटी वाढ ७.३ टक्के राहणार आहे. जीएसटी ही एक मोठी आर्थिक सुधारणा असल्याचे मत व्यक्त करीत फिचने त्याचा अर्थव्यवस्थेवर काही काळापुरता परिणाम राहणार असल्याचे म्हटले आहे.
शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने, निर्देशांकांमध्ये वाढ
शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात आज सोमवारी तेजीने झाली. बाजाराचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक आज वाढले. संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा ३५ हजार बिंदूंवर येत दिवसअखेरीस ३५ हजार १६० बिंदूंवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ७०० बिंदूंवर पुनरागमन करीत १० हजार ७३९ बिंदूंवर बंद झाला. बँक निफ्टीही २५ हजार ५०० बिंदूंची पातळी पुन्हा एकदा गाठत दिवसअखेरीस तो २५ हजार ५३१ बिंदूंवर बंद झाला. याआधी सेन्सेक्स, निफ्टी व बँक निफ्टी यांनी अनुक्रमे ३५ हजार २१३, १० हजार ७५९ व २५ हजार ६१७ बिंदूंची उच्च पातळी गाठली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@