सरकार भीमा कोरेगाव प्रकरणाबद्दल गंभीर नाही : नवाब मलिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |


 

नवी दिल्ली :
  आज भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासाठी एका तरुणानी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली, या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारला वेठीस धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांनी सरकारवर आरोप करत, " सरकार भीमा कोरेगाव प्रकरणी गंभीर नाही." असे म्हटले आहे.

 
 
 
आत्मदहनाच्या प्रयत्नाच्या घटनेविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला जबाबदार धरत कारवाई करण्याची मागणी केली आहे. "आरोपीला अटक करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार टाळाटाळ करत आहे. सरकारने याची दखल घ्यावी. सरकारने याबाबतीत गंभीर व्हायला होऊन तात्काळ कारवाई करावी. सरकार काहीच करत नाही म्हणून जनता हा मार्ग निवडत आहे." असे म्हणत नवाब मलिक यांनी सरकारला वेठीस धरले आहे.
 
 
 
"भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे याला अटक व्हावी या मागणीसाठी एका तरुणाने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. हे गंभीर आहे. सरकारने आताच जागं व्हायला हवं. भिडेला अटक व्हावी या मागणीसाठी दलित समाजाची भावना किती तीव्र आहे हे यातून दिसून येते." असेही ते म्हणाले आहे. या वक्तव्यातून पुन्हा एकदा त्यांनी दलित समाजाचे नाव घेत नवीन वादाला जन्म दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@