अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले खासदार ए.टी.पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 

 
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले खासदार ए.टी.पाटील
पारोळा,
लग्नसराईचे दिवस असल्याने गर्दीमुळे बस इ.सार्वजनिक परिवहन सेवेने प्रवास करणे कठीण असल्याने डॉ. गढरी हे आपल्या दुचाकीने लग्न कार्याहून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. एरंडोल तालुक्यातील फरकांड्याजवळ सवरखेडा - करमाड रस्त्यावरील या अपघातात डॉ. गढरी हे दैव बलवत्तर होते म्हणून सुरक्षित राहू शकले.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा भर दुपारी अपघात होताच त्याच रस्त्याने जळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील त्याच रस्त्याने जात होते.
अपघात पाहताच खासदार पाटील त्यांच्या मदतीला देवासारखे धावून आल्याचे अपघातग्रस्त डॉ. गढरी यांनी सांगितले.
प्रसंगावधान राखून खासदार ए. टी. नाना पाटील यांनी त्यांची गाडी थांबवून ते स्वतः माझ्या मदतीला धावून आले. अपघात झाल्यानंतर मला काही उमजलेच नाही. मात्र मला गाडी जवळून उचलून खासदारांनी धीर देत उभे केले. त्यांच्या गाडीतून पाणी आणून मला स्वतः च्या हाताने पाजले. माझ्या सारख्या सामान्य नागरिकांसाठी त्यांनी केलेल्या मदतीमुळे माझे प्राण वाचल्याची भावना डॉ. गढरी यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर खा.पाटलांनी त्यांना पारोळा येथील कॉटेज रुग्णालयात भरती करून कर्तव्य बजावले. माणुसकीची भावना व सहवेदन जपल्याबद्दल सर्व स्तरातून खासदार ए. टी. नाना पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@