अवैध वृक्षतोड आणि वाहतूकलाकडासह ट्रक ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 
 
अवैध वृक्षतोड आणि वाहतूक
लाकडासह ट्रक ताब्यात
तभा वृत्तसेवा
यावल, २ मे
तालुक्यातील साकळी परिसरात अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करणार्‍या एका ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुप्त माहिती वरून प्रादेशिक वनविभाग पश्चिमच्या वनक्षेत्रपाल यांच्या पथकाने केली व सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. किनगाव येथील लाकूड व्यवसायिक शकील खाटीक यांचा हा माल असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.
तालुक्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून त्याचा व्यवसाय राजरोज पणे चालतो. त्यात सातपुड्यातून अवैधरित्या सागवान लाकूड देखील या भागात येत असते. नीम वृक्षाची कत्तल करून ते विविध ठिकाणी पाठवण्यात येते.
याची गोपनिय माहिती प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह रात्री सापळा लावला व साकळी ता. यावल या भागात अवैधरित्या नीम वृक्षांची तोड करून ट्रक क्रमांक एम. एच. १९ , ४३१७ या मधून लपवून नेण्यात येत होते तेव्हा वाहन थांबवत त्याची तपासणी केली असता त्यात निम प्रजातीच्या लाकडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ट्रकचालक व वाहक हे वाहन सोडून पसार झाले.
तपासाअंती किनगावचे लाकूड व्यवसायिक शकील खाटीक यांच्या मालकीचे हे लाकूड असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत वनरक्षक निंबा पाटील, ईश्वर मोरे, राकेश निकुंभ, रज्जाक तडवी, बाळासाहेब नलावडे यांचा सहभाग होता.
 
कारवाईमुळे खळबळ
या कारवाईमुळे किनगाव सह पश्चिम भागातील अवैध सागवान सह विविध लाकडांचा व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहेे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@