शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना : रवीशंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : 
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन योजना लागू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली. आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेतकऱ्यांची मिळकत २०२२ पर्यंत दुप्पट व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, यासाठी आज केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
कृषि विभागाच्या अनेक योजना आता पर्यंत राबविण्यात येत आहेत, मात्र आता या ११ योजनांचे एकत्रित स्वरूप " हरित क्रांती कृषोन्नती योजना" या नावाने राबविले जाणार आहे. यासाठी केंद्रसरकारने अर्थसंकल्पात देखील विशेष तरतूद केली आहे. २०१९-२०२० या वर्षासाठी या योजनेकरता ३३,२७३ कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या शिवाय देशात २० एम्स रुग्णालयांचा निर्माण करणार असल्याचे देखील जाहीर केले.
  
अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यांसाठी विशेष योजना :

आजच्या या बैठकीत अल्पसंख्यांक समाजासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. आधी या अल्पसंख्यांक कल्याण योजनेंतर्गत केवळ १९६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता, मात्र आता ३०८ जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
  

सर्वोच्च न्यायालयावरील प्रश्नाचे देखील उत्तर दिले :

यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर देखील उत्तर दिले. कोलेजियम विषयावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "सरकार न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांचा आदर करते. उत्तराखंड येथे न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयामुळे आम्ही तेथील न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनविण्यास नकार देत आहोत असे म्हणणे योग्य नाही. आम्हाला न्याय पालिकेवर विश्वास आहे, आणि त्यांच्या निर्णयावर देखील, असेही ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@