डिजीटल स्वाक्षरीमुळे शेतकऱ्यांना ७/१२ मिळण्याची प्रक्रिया जलद-पालकमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरी ७/१२ वितरण कार्यक्रम
 
डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ करण्यामध्ये जिल्हा विभागात अव्वल


बुलडाणा : शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ७/१२ हा अत्यंत महत्वाचे कागदपत्रे आहे. या कागदपत्रासाठी तलाठी साजांचे उंबरठे त्याला झिजवावे लागायचे. ताटकळत प्रतिक्षा करीत हा ७/१२ त्याला मिळत असे. आता मात्र शेतकऱ्यांना सहज अत्यंत सोप्या पद्धतीने डिजीटल स्वाक्षरी असलेला ७/१२ मिळणार आहे. या डिजीटल स्वाक्षरीमुळे जलद गतीने ७/१२ देणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे, असा विश्वास राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केला.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे आदी उपस्थित होते.
 
 
सर्वप्रथम व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे राज्यस्तरीय डिजीटल स्वाक्षरी ७/१२ वितरण कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यक्रम सुरू झाला. राज्य शासन अनेक दिवसांपासून डिजीटल स्वाक्षरीचा ७/१२ देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात ७० हजार ७८२ सात बारा डिजीटल स्वाक्षरीयुक्त करण्यात आले असून हे काम ५२५ तलाठी साझाद्वारे करण्यात आले आहे. या कामामध्ये महसूल यंत्रणेने केलेले काम उल्लेखनिय आहे.
@@AUTHORINFO_V1@@