वायू प्रदुषणामुळे दरवर्षी ७० लाख नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘who’ने केलेल्या सर्वेक्षणात जगात दरवर्षी वायू प्रदुषणामुळे ७० लाख नागरिकांचा मृत्यू होतो असे नमूद करण्यात आले आहे. यातील जास्तीतजास्त नागरिक हे आशिया आणि आफ्रिका खंडातील आहेत असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. यात एक तृतिआंश मृत्यू हे फुफ्फुस खराब झाल्याने तसेच हृदयासंबधी आजारामुळे होतात. 
 
 
 
 
 
वाढत्या प्रदुषणामुळे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये श्वासाचे रोग वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. पृथ्वीवरील १० पैकी ९ व्यक्ती प्रदूषित हवेत श्वास घेण्यास हतबल आहेत असेही या सर्वेक्षणात नमूद केले आहे. शुद्ध हवा ही प्रत्येक नागरिकाची गरज तसेच जीवनावश्यक बाब आहे त्यामुळे यावर उपाय करणे गरजेचे आहे असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. 
 
 
 
दिवसेंदिवस हवेचा स्तर प्रदूषित होत चालला आहे. आजच्या प्रमाणे जर भविष्यात सुरु राहिले तर आपल्याला ऑक्सिजन कमी पडेल आणि श्वासासंबंधी रोग होतील असेही सांगण्यात आले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@