जोजिला बोगद्याने प्रगतीचा मार्ग उघडेल : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
लेह : जोजिला बोगद्याने प्रगतीचा मार्ग उघडेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज लेह येथे जोजिला बोगद्याच्या पायाभरणी सोहळ्यात नरेंद्र मोदी बोलत होते यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. केंद्र आणी राज्य दोन्ही मिळून जम्मू-काश्मीरच्या विकासाला गती देत असून आम्ही देखील जम्मू-काश्मीरच्या विकासाला प्राधान्य देत आहोत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
 
 
 
 
 
या विकास कामांमुळे लेहमध्ये नागरिकांचे जीवन सुधारू लागेल आणि याचा तेथील नागरिकांना मोठा फायदा पोहोचेल. जोजिला बोगद्याने भारताची धोरणात्मक दृष्टी अजून मजबूत होईल तसेच जवानांना या मार्गाने प्रवास करणे सोयीस्कर आणि फायद्याचे ठरेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आशियामधील सगळ्यात मोठा बोगदा म्हणून जोजिला बोगदा ओळखला जाईल. हा आशियातील सगळ्यात मोठा बोगदा ठरणार आहे ही माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
 
तसेच आज नरेंद्र मोदी श्रीनगरच्या दौऱ्यावर देखील गेले असून येथे त्यांनी किशनगंगा जल विद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. तसेच त्यांनी यावेळी श्रीनगर रिंग रोड याचे देखील उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@