दुचाकी - ट्क अपघातात २ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |

 
जळगाव :
जळगाव कडून शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला, तर दुसर्‍यास जळगाव येथे उपचारास नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 
शहराजवळील रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. सुनील मधुकर मराठे (वय ३२, रा.विवेकानंद नगर, जामनेर) व गजानन काळू कोकाटे (वय ३२, रा.श्रीराम पेठ, जामनेर) हे अपघातात ठार झाले.अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला.
 
 
गंभीर जखमी अवस्थेतील गजानन यास उपचारासाठी जळगावला नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच रात्रीच पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती शहरात समजताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विवेकानंद नगर व श्रीराम पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. भिका कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-५०६१) च्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@