येडीयुरप्पा यांची बहुमत चाचणी काही क्षणांत..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची बहुमत चाचणी काही तासांतच होणार असून आज दुपारी चार वाजता येडीयुरप्पा यांना ही बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आज चारपर्यंतची वेळ येडीयुरप्पा यांच्या सरकारला दिली होती. त्याप्रमाणे आता येडीयुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
कालपासून भारतीय जनता पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी धावपळ करत असून आता चार वाजता भाजपच्या बाजूने किती आमदार उभे राहतात हे भाजपला  सिद्ध करायचे आहे. कर्नाटकच्या राजकारणात जे चालले आहे ते संविधानाच्या विरुद्ध आहे असे म्हणणे काँग्रेसचे असल्याने काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
 
 
 
येडीयुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र या याचिकेच्या सुनावणीनुसार काल सर्वोच्च न्यायालयाने येडीयुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता काही तासांतच येडीयुरप्पा यांचे भवितव्य ठरणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@