नेपाळ आणि दुबईत श्री स्वामी समर्थ सेवेचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |
 

 
 
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील जवळपास सर्व प्रमुख राज्यांमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे काम जोमाने सुरू असून आता भारताबाहेरही सेवामार्गाच्या कार्याची मागणी होऊ लागल्याने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मोरे यांच्या पुढाकाराने सक्रिय असलेल्या देश-विदेश अभियाना अंतर्गत मे २०१८ मध्ये दुबई आणि नेपाळ या दोन देशांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच विविध शाळांमध्ये बालसंस्कार वर्गांचा शुभारंभ करण्यात आला असून स्थानिक जनतेचा या कार्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे.
 
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाअंतर्गत काम करणार्‍या देश-विदेश अभियानाच्या वतीने महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्य व भारताबाहेरील देशांमध्ये सेवामार्गाचे काम पोहोचविण्यासाठी नितीन मोरे व त्यांचे जवळपास ५०० तरुण सेवेकरी सहकारी अथक परिश्रम घेत आहेत, त्याचेच फलस्वरूप म्हणून आज अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, जर्मनी, सिंगापूर, बेल्जियम, नेपाळ, ऑस्ट्रेलिया आणि दुबई या देशातील महानगरांमध्ये सेवामार्गाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्री स्वामी समर्थ महोत्सव नेपाळ २०१८ अंतर्गत नितीन मोरे यांनी आपल्या सहकार्‍यांसह नेपाळचा दौरा केला. नेपाळच्या राजकन्या सीतासमा राज्यलक्ष्मी देवी शाह यांनी काठमांडूत त्यांचे स्वागत केले.
 
नवीन केंद्रांच्या शुभारंभासह श्री गणेश याग, श्री स्वामी याग, शक्तीपीठ श्री गुह्येश्वरी येथे चण्डियाग, नेपाळमधील बालसंस्कार कार्य करणार्‍या सेवेकर्‍यांचे प्रशिक्षण, शाळांमध्ये बालसंस्कार वर्गांचा शुभारंभ, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्र, आयुर्वेद आरोग्य मार्गदर्शन व रुग्ण तपासणी, गर्भसंस्कार व सुजाण पालकत्व, रुद्रयाग, कृषी व गोवंश मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नेपाळमध्ये झालेल्या विविध उपक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकार्‍यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सेवामार्गाच्या दुबई केंद्रातर्फे ऑक्टोबर महिन्यात ’श्री स्वामी समर्थ महोत्सव दुबई २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातदेखील श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या विविध विभागांचे सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल.
@@AUTHORINFO_V1@@