रावेरमध्ये नायब तहसीलदारांचे घर फोडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |

६७ हजारांचा ऐवज लंपास

रावेर :
घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी नायब तहसीलदाराच्या घरात घरफोडी करत रोख रकमेसह ६७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला.
 
 
जुन्या सावदा रोडवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळील कॉलनीतील रहिवासी तथा फैजपूर विभागीय दंडाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी.सी. धनगर हे कुटूंबासह गावी गेले होते. त्यांच्या घराचे दार बंद असल्याची संधी साधत घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १२ हजार ५०० रूपए रोख, तसेच २० हजार रूपए किमतीचे १०० भार वजनाचे चांदीच्या पाटल्या, ३६ हजार किमतीचे कानातील सोन्याचे टोंगल असा एकूण ६७ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरीस गेला. नायब तहसीलदार पी.सी. धनगर हे १७ रोजी घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे उघडकिस आले.त्यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@