कर्नाटकच्या नाट्यमय घडामोडीनंतर येडीयुरप्पा यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : कर्नाटकच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज शेवटी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत चाचणी परीक्षणाच्या आधीच येडीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून असे कळते की, भारतीय जनता पक्ष बहुमत मिळवू शकले नसल्याने येडीयुरप्पा यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 
 
 
भारतीय जनता पक्षाकडे १०४ जागांचे संख्याबळ होते. मात्र भाजपला ११२ आमदारांचे पाठबळ हवे होते हे पाठबळ भाजप मिळवू शकला नसल्याने येडीयुरप्पा यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून टाकला आहे. आता कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस यांचे संयुक्त सरकार स्थापन होणार असून जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 
 
 
 
यावेळी येडीयुरप्पा यांनी विधानसभेत अतिशय भावूक भाषण दिले तसेच पुढच्या वेळी मी १५० जागा जिंकून परत येईल असे ते यावेळी म्हणाले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कर्नाटकची सेवा करेल तसेच जनतेने आम्हाला १०४ जागांचा विश्वास दिला मात्र काँग्रेस आणि जेडीएसवर तेवढाही विश्वास जनतेने दाखविला नाही असे मत त्यांनी यावेळी विधानसभेत दिलेल्या भाषणात व्यक्त केले. 
 
 
 
येडीयुरप्पा यांचे भाषण संपताच जेडीएसच्या नेत्यांनी विधानसभेत एकच जल्लोष केला असून कुमारस्वामी यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. आता काही क्षणांतच येडीयुरप्पा राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास जातील. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@