यंदा मान्सूनचे आगमन जून अगोदरच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |

हवामान खात्याकडून अधिकृत तारीख जाहीर

२९ मे ला केरळमध्ये येणार 




नवी दिल्ली :
प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये येणारा मान्सून यंदा मात्र मे महिन्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यंदाचा मान्सून हा २९ मे केरळमध्ये येणार असून दर वर्षींच्या तुलनेत यंदा तो तब्बल ८ दिवस अगोदर भारतात येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.

हवामान खात्याने आज याविषयी अधिकृत माहिती जाहीर केली असून मान्सूनच्या आगमनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजे २० तारखेला मान्सून हा अंदमानात पोहोचणार आहे. त्यानंतर २३ तारखेपर्यंत तो बंगालचा उपसागर पार करून २९ तारखेला केरळमध्ये दाखल होईल व ३० तारखेपासून दक्षिण भारतामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

दरम्यान याविषयी काही अधिकची माहिती देताना हवामान खात्याने गेल्या २०१३ ते २०१७ च्या मान्सूनच्या आगमनाचा तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. यानुसार २०१५ आणि २०१७ मध्ये देखील मान्सून ३० मे ला भारतामध्ये आला होता, असे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान यावर्षी मात्र तो १ दिवस अगोदर म्हणजे २९ तारखेला भारतात येईल, असा अंदाज खात्य्ने वर्तवला आहे.

हवामान खात्याचे माहिती पत्रक :

@@AUTHORINFO_V1@@