हवाई येथील सगळ्यात मोठा ज्वालामुखी सक्रीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
अमेरिका : अमेरिकेतील हवाई बेटावरील जगातील सगळ्यात मोठा आणि सक्रीय ज्वालामुखी काल फुटला असून ज्वालामुखी फुटल्यावर त्याचा लावारास ३० हजार फुटापेक्षा देखील उंच उडाला असून यामुळे वातावरणात उष्णता पसरली आहे. किलुआ येथे हा ज्वालामुखी सक्रीय झाला असून शास्त्रज्ञांच्या मते हा ज्वालामुखी कधी कधी सक्रीय होतो. 
 
 
 
मात्र आता हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात फुटला असून याचा लावारास आसपासच्या गावांना गिळत असून यामुळे आसपासच्या गावकऱ्यांना घरे सोडावी लागत आहेत. तसेच काही नागरिकांची घरे जळून गेली आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. या ज्वालामुखीमुळे वातावरणामध्ये विषारी वायू पसरू लागला आहेत. त्यामुळे नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश तेथील स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. 
 
 
 
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे हवाई बेटांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी ही घटना घडल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान आतापर्यंत यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@