चाळीसगावात दरोडेखोरांची टोळी गजाआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
चाळीसगावात दरोडेखोरांची टोळी गजाआड
चाळीसगाव, १८ मे
राष्ट्ीय महामार्गाक्र. २११ सोलापूर-धुळे महामार्गावर कन्नड घाटाता जबरीनेलुट करणार्‍यांना चाळीसगाव पोलीसांनी शिताफिने अटक केली आहे.
 
शुक्रवार रोजी सकाळी २ वाजेच्या सुमारास कन्नड घाटातील दर्ग्याजवळ दगड आडवे लावून चाकुचा धाक दाखवून ,जबरीने जगदिशसिंग प्रभुराम चौधरी यांना लुटले त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले . लुटीची माहिती मिळाल्याने रात्रीचे गस्त करणारे पोलिस कर्मचारी पो.हे.कॉ. शशिकांत महाजन, पोना गणपत महिरे, विनोद भोई, पो.कॉ. बिभीषण सांगळे, नितेश पाटील यांनी दोन दुचाकीने पळून जाणारे संशयीत भागवत बाळु पाटील व अश्‍विन शांताराम चव्हाण यांना पकडले. आरोपींना जगदिशसिंग चौधरी व हनिफ करिम बक्श यांना दाखविले असता.त्यांनी आरोपींना ओळखले.पोलिसांनी त्यांची चौकशी करुन त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे , अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात पोलिसंाचे चार पथक करण्यात आले. पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सापळा रचुन दोन मोटर सायकलवर टि् पल शीट बसून पळुन जात असलेल्या विष्णू रामलाल लोणारे, अंकुश रामचंद्र गांगुर्डे , हिरामण संजू सोनवणे, समाधान रामदास मस्के, गोकुळ युवराज सोनवणे, विष्णु देवानंद सोनवणे यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. तसेच गौतम रणछोड पगारे व पुष्कर कैलास चौधरी यांना एका दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.
 
 
मुद्देमाल जप्त
संशयीत आरोपींकडून
२१ हजार ९५० रुपये रोख, चोरी केलेला काळ्या रंगाचा मोबाईल,तीन चाकु, एक शार्प कटर, आठ मास्क, नऊ मोबाईल हॅन्डसेट व चार दुचाकी जप्त करण्यात आले.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
 
 
या कारवाईत यांचा होता सहभाग
सपोनि दिपक बोरसे, दिलीप शिरसाठ , पो.उ.नि. रमेश मानकर, प्रदिप वाल्हे, स.फौ.हरेश्‍वर जगताप, पो.हे.कॉ. विलास पाटील, शशिकांत महाजन, पो.कॉ. ज्ञानेश्‍वर बडगुजर, बिभीषण सांगळे, गणेश पवार, ज्ञानेश्‍वर वाघ, परिचंद्र पाटील, सुनिल निकम, नितीन पाटील, राहुल गुंजाळ, पो.ना. गणपत महिरे, विनोद भोई व चालक नितेश पाटील यांचा सहभाग होता.
 
संशीत आरोपी हे १८ ते २१ वयोगटातील असून त्यातील अनेक जण हे शिक्षण घेत आहेत तर काही मजुरी करणारे आहेत. आरोपींकडून सखोल चौकशी केली जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@