कर्नाटकचा नियम बिहारमध्येही लागू व्हावा : तेजस्वी यादव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |

 




 

पटना : कर्नाटकात सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नावाखाली ज्या प्रकारे भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आले, त्याच प्रकारे बिहार निवडणुकांमध्ये राज्यातील ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ म्हणून समोर आलेल्या राष्ट्रीय जनता दलाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात यावे, असे आवाहन बिहार माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले आहे. तसेच बिहारमध्ये सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत देखील आपल्याकडे असून राज्यपालांनी राजदला संधी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

यादव यांनी नुकतीचे बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना याविषयी पत्र लिहून विनंती केली आहे, कि त्यांनी राजदला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावे. कर्नाटकात ज्याप्रकारे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली. त्याच प्रकारे आता बिहारमध्ये देखील राज्यपाल त्रिपाठी यांनी त्याच तत्वावर राजदला सत्ता स्थापनेची संधी द्यावी. यानंतर तातडीने राजद सभागृहात आपले बहुमत देखील सिद्ध करेल, असे यादव यांनी म्हटले आहे.



 

याचबरोबर आपल्याला कॉंग्रेस आणि राज्यातील कम्युनिस्ट पक्षाचा देखील पाठींबा असल्याचे यादव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या पक्षांकडून देखील त्रिपाठी यांना स्वतंत्रपणे पत्र पाठवण्यात आले असून यामध्ये कर्नाटकातील घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच राजदला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण द्यावे, असे आवाहन या पक्षांकडून करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@