उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या सत्ता स्थापनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आज सकाळी या याचिकेवर सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय जाहीर केला आहे. 
 
 
कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र आता ही मुदत पूर्व म्हणजे उद्या चार वाजता येडीयुरप्पा सरकारला हे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे उद्या कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांचे सरकार राहते की काँग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार स्थापन करावे लागते याकडे सगळ्यांच्या नजर लागल्या आहेत. 
 
  
कर्नाटकच्या राजकारणात जे चालले आहे ते संविधानाच्या विरुद्ध आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली असून आता उद्यापर्यंत येडीयुरप्पा यांच्या सरकारला हे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@