पुणे विभागाला १ कोटी ५५ लाखाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
 
उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 
पुणे : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी २०१९ पर्यंत ५०  कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यावर्षी १  ते ३१ जुलै दरम्यान १३  कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागासाठी  १  कोटी ५५  लक्ष ९०  हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्या त्या जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आजच्या विभागीय आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेने आपले सादरीकरण केले, यावेळी बोलताना वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम नियोजनाबरोबरच पारदर्शकता ठेवा आणि विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्या, असे आवाहन बैठकीत केले.
 
विधान भवनाच्या सभागृहात पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व सांगली जिल्हयाची आढावा बैठक सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार सर्वश्री उदयनराजे भोसले, शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकाते-पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, बबनराव शिंदे, आनंदराव पाटील, प्रशांत परिचारक, विजय काळे, जगदिश मुळीक, भीमराव तापकीर, आमदार मेधा गाडगीळ, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) व्ही. के. आगरवाल, मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व नियोजन) एस. एच. पाटील, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, कृषी, वन, जलसंपदा व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
 
प्रारंभी विभागीय आयुक्त यांनी आपल्या प्रस्ताविकात पुणे विभागात वृक्ष लागवडीचे १  कोटी ५५  लाख ९०  हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून २  कोटी ९९  लक्ष रोपे उपलब्ध आहेत. १  कोटी  १७  लक्ष ७२  हजार खड्‌याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ७६ टक्के खड्डे खोदून झाले आहेत. हरीत सेनांचे उद्दिष्ट १३  लाख ६४  हजाराचे असून ७  लाख १०  हजाराचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीसाठी २  लाख ६३  हजार ७४८  हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून त्याची लांबी ३९  हजार २१९  किलोमीटर एवढी आहे. वन, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत या बरोबरच ३३ विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@