विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचे मतदान सोमवार दि. २१ मे रोजी होत असून यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
 
प्रत्येक तालुका स्तरावरील तहसील कार्यालये, तसेच नाशिकमधील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे दालन येथे मतदान केंद्र असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायतीचे सर्व सदस्य, नगरपरिषदेचे सर्व सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि महानगरपालिकातील सर्व सदस्य हे संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदान करतील. एकूण ६४४ मतदार आहेत. नाशिक महानगरपालिका, भगूर नगर परिषद, देवळाली छावणी परिषद, नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे १६० मतदार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रोहयो दालन मतदान केंद्रांवर मतदान करतील.
 
दिंडोरी तहसील कार्यालयात २६, पेठ तहसील कार्यालय २२, इगतपुरी तहसील कार्यालय २७, त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय २४, निफाड तहसील कार्यालय २९, सिन्नर तहसील कार्यालय ३९, येवला तहसील कार्यालय ३४, मालेगाव तहसील कार्यालय ९७, नांदगाव तहसील कार्यालय ५०, चांदवड तहसील कार्यालय २४, कळवण तहसील कार्यालय २५, देवळा तहसील कार्यालय २३, बागलाण तहसील कार्यालय ३२ आणि सुरगाणा तहसील कार्यालयात २२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@