महाव्यवस्थापकांकडून योग्य भूमिका न मांडल्यास समितीला वेगळा विचार करावा लागेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |

बेस्ट समितीचा इशारा

 
 
 
 
 
मुंबई : बेस्टच्या बसमध्ये तिकीट वाटपासाठी वापरण्यात येत असलेल्या ट्रायमेक्स मशीन संदर्भात बेस्ट समितीच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे करत आहेत. महाव्यवस्थापकांकडून योग्य भूमिका न मांडल्यास समितीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा बेस्ट समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिला. तसेच बेस्ट उपक्रमातून परत राज्य सरकारच्या सेवेत पाठविण्यात यावे, अशी एकमूखी मागणी बेस्ट समितीत सदस्यांनी केली.
 
सहास सामंत यांनी बस वाहकांना बेस्ट प्रशासन ट्रायमॅक्स मशीनसाठी आवश्यक चार्जर देत नाही त्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत आहे असा हरकतीचा मुद्दा बेस्ट समितीच्या बैठकीत मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. ६५ टक्के ट्रायमॅक्स मशिन्स जुन्या झाल्या व नादुरुस्त झाल्या आहेत. ट्रायमॅक्स कंपनीकडून नवीन मशिन्स सॉफ्टवेअर बेस्टला देण्यास तयार आहे. मात्र महाव्यवस्थापक हे ट्रायमॅक्स मशीनबाबत योग्य तो निर्णय घेत नाहीत. ट्रायमॅक्स मशीन खरेदीबाबत बेस्टने कंपनीसोबत करार केला आहे. परंतु, महाव्यवस्थापक हे त्यासाठी अनुकूल नसून नवीन टेंडर काढण्यास उत्सुक आहेत. याकरिता जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत. तर ट्रायमॅक्स कंपनीने दिलेल्या नवीन मशिन्सही महाव्यवस्थापकांनी परत पाठवल्या आहेत.
 
महाव्यवस्थापक दुसऱ्या कंपनीच्या मशिन्स खरेदी करण्यावर ठाम असल्याने बेस्टला आर्थिक फटका बसणार असल्याचा आरोप अनिल कोकिळ यांनी केला. तसेच बेस्टचे आर्थिक नुकसान हे जाणीवपूर्वक केले जात आहे का, याची माहिती घ्यायला हवी. बसवाहकाकडे जास्त पैसे आढळून आल्यास त्यास बडतर्फ केले जाते, मग महाव्यवस्थापकांनी बडतर्फ करायला हवे, असे सांगत उपक्रमात मनमानी कारभार करणाऱ्या महाव्यवस्थापकांना शासन दरबारी परत पाठवा, अशी मागणी केली. बेस्ट समिती सदस्य राजेश कुसळे व अनिल पाटणकर यांनी कोकीळ यांच्या मागणीचे समर्थन केले. पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांवर अविश्वास ठराव आणण्याची सूचना केली. ट्रायमेक्सबाबत महाव्यवस्थापकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. नवीन कंपनीला काम देण्याचा घाट घालू नये. अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिला.
@@AUTHORINFO_V1@@