आज सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकार स्थापनेवरील याचिकेवर सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली :  काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र येथेच कर्नाटकचे सत्तानाट्य संपले नसून आज सर्वोच्च न्यायालयात येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील अथवा त्यांना आपले पद सोडावे लागेल हे कळणार आहे. येडीयुरप्पा यांच्या सत्ता स्थापनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. काल झालेल्या शपथविधीची वैधता सर्वोच्च न्यायालय ठरवणार असल्याने आता आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
 
काल येडीयुरप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जेडीएसचे कार्यकर्ते यांनी या शपथविधीला विरोध दर्शवत राजभवनाबाहेर धरणे आंदोलन केले. या शपथविधीला भारतीय जनता पक्षाचे फारसे नेते देखील उपस्थित नव्हते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे एकंदरीत कालचा शपथविधी हा वादाच्या वातावरणातचं पार पडला. 
 
 
कर्नाटकच्या राजकारणात जे चालले आहे ते संविधानाच्या विरुद्ध आहे असे म्हणणे काँग्रेसचे असल्याने काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आता याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. आमदारांच्या पाठिंब्याची यादी आज येडीयुरप्पा सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करणार आहे. यावर सर्वोच्च न्यायालय दोन्ही पक्षांचा विचार ऐकून यावर सुनावणी करणार आहे. 
 
 
मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने येडीयुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानुसार काल येडीयुरप्पा यांनी कर्नाटक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@