आठवले यांचा हा पुतळा पहिला का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |





मुंबई :
आपल्या मिश्किल कवितांनी विरोधकांची 'पोलखोल' करणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे नुकतेच नवी मुंबई येथे अनावरण करण्यात आले आहे. लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यासाठी म्हणून आठवले यांचा हा पुतळा तयार करण्यात आला असून पुतळे असलेल्या मोजक्या राजकारणी व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.



मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. लोणावळा येथील प्रसिद्ध शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी हा पुतळा तयार केलेला आहे. या पुतळ्याचे एकूण वजन हे २५ किलोग्रॅम असून अगदी हुबेहुबे आठवले यांच्या सारखा हा पुतळा तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या निर्मिती आणि कारागिरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः कुंडीलूर यांचे कौतुक केले, तसेच पुतळ्याचे उद्घाटन करत आठवले यांचे देखील अभिनंदन केले. यावेळी आठवले यांच्यासह त्यांच्या पत्नी सीमा आठवले व मुलगा जीत आठवले हे देखील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@