बहुमत चाचणीसाठी भाजप आमदाराची सभापती म्हणून नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |

राज्यपालांकडून के.जी. बोपय्या यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती 





बेंगळूरू : गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय वादाला विराम मिळण्याचे चिन्हे अद्याप दिसत नाहीत. बहुमत नसताना देखील भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या वादग्रस्त निर्णयानंतर राज्यपालांच्या आणखी एका निर्णयाने आता राज्यात वादंग निर्माण केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपच्या बहुमत चाचणीसाठी म्हणून भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची सभागृहाचे हंगामी सभापती म्हणून निवड केली असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल यांनी पुन्हा एकदा आपल्या पदाचा दुरुपयोग केला असून राज्यपाल हे संविधानाचा पूर्णपणे अनादर करत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाने दिली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात बहुमत चाचणीसाठीची सर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान राज्यपाल वाला यांनी तातडीने बोपय्या यांची सभागृहाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच यासंबंधीची एक सूचनापत्र देखील जारी करत राज्य सचिव आणि इतरांना याविषयी माहिती दिली. दरम्यान राज्यपालांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी यावर आक्षेप घेत, बोपय्या यांची निवड म्हणजे एक राजकीय खेळी असल्याचा दावा केला आहे. प्रथमतः राज्यपालांनी बहुमत नसताना भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले व त्यानंतर आता बहुमत सिद्ध करण्यामध्ये भाजपला मदत व्हावी, म्हणून बोपय्या यांची हंगामी सभापती म्हणून त्यांनी निवड केल्याचा थेट आरोप कॉंग्रेस आणि विरोधकांनी केला आहे. तसेच भाजप आणि राज्यपाल वाला हे लोकशाहीची हत्या करत असल्याची कॉंग्रेसने केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@