पंतप्रधानांच्या दौऱ्याअगोदर काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |



हंडवारा :
भारत सरकारने रमजान महिन्यामध्ये शस्त्रसंधी पाळण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय सैनिकांवर हल्ला करू पाहणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील हंडवारा येथे भारतीय लष्कराने ही कारवाई केली असून रमजान शस्त्रसंधीच्या मान्यतेनंतर भारतीय लष्कराची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

दरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार मात्र अद्याप सुरु आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये आतापर्यंत एका भारतीय जवानासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १० जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्कर देखील चोख प्रत्युत्तर देत असून पाकिस्तान सैनिकांच्या चौक्यांवर भारतीय सैन्येने हल्ले सुरु केलेले आहेत.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या जम्मू-काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते जम्मू-काश्मीरमध्ये अनेक विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान सैनिकांकडून जाणूनबुजून हा गोळीबार केला जात असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगितले जात आहे. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यातील सर्व सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त केल्याचे लष्कराने सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@