राज्यपालांचे वर्तणूक पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे : यशवंत सिन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |

कर्नाटकमधील स्थितीवरून राज्यपालांवर थेट टीका

देशात सध्या 'इंडियन पॉलिटिकल लीग' सुरु असल्याची टीका





नवी दिल्ली : '
कर्नाटकातील राज्यपालांनी आपल्या कर्तव्यांचे योग्यरीत्या पालन केले नसून राज्यपाल हे पक्षाचे (भाजपचे) एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याप्रमाणे वर्तन करत आहेत, अशी टीका माजी भाजप नेते व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज केली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भावनासमोर पत्रकारांशी ते आज बोलत होते.
 
 
'कर्नाटक राज्यपालांची वर्तणूक ही अत्यंत चुकीची असून त्यांनी आपल्या संवैधानिक मूल्यांनाच जणू तिलांजली दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात ज्या ज्याठिकाणी निवडणुका झाल्या आहेत, त्याठिकाणी भाजपने बहुमताचा दावा केल्यानंतर लगेच प्रत्येक राज्यपालांना भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. परंतु कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसकडे बहुमत असताना आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला असताना देखील राज्यपालांनी त्यांना आमंत्रण न देता, भाजपला सत्ता स्थापन करण्याची परवानगी दिली. वरून देशातील राज्यपाल हे संविधानाला न मानता पक्षाच्या आदेशाला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसत आहे' असे सिन्हा यांनी म्हटले. तसेच ही बाब अत्यंत चिंताजनक असून देशाची लोकशाही धोक्यात असल्याचेच यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सिन्हा यांनी म्हटले.
 

देशात सध्या 'इंडियन पॉलिटिकल लीग' सुरु

 कर्नाटक निवडणुकांची आकडेवारी समोर आली असून भाजपकडे फक्त १०४ जागा आहेत. बाकीच्या सर्व जागा या कॉंग्रेस, जेडीएस आणि इतर पक्षांकडे आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या ८ आमदारांचे पाठबळ देत कशा प्रकारे उभे करणार हे जग जाहीर आहे. भाजप सध्या आयपीएलप्रमाणे कर्नाटकात आमदार विकत घेत आहे. परंतु हे सर्व समोर असताना देखील राज्यपालांनी याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राज्यपालांच्या एकनिष्ठेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे, अशी थेट टीका त्यांनी यावेळी केली. .

 
 
येडीयुरप्पा यांनी राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर सिन्हा यांनी राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. भाजप देशात जे काही करत आहे ते पूर्णपणे असंवैधानिक असून याविरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@