डेटा लिक प्रकरणी फेसबुककडून तब्ब्ल २०० ऍप्सवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |


कॅलिफोर्निया : फेसबुक युजर्सचा डेटा लिक होऊ नये म्हणून फेसबुकने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनाच डेटा लिक करण्याच्या संशयावरून फेसबुकने आतापर्यंत २०० हुन अधिक ऍप्सवर कारवाई केली असून त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आले आहे. तसेच आणखी काही ऍप्सची चौकशी सुरु असून त्यामध्ये देखील अनुचित आढळ्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश फेसबुक ने दिले आहेत.

याचबरोबर फेसबुक प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करणाऱ्या अनेक फेक अकाऊंट्सवर देखील कारवाई करण्यात आली असल्याचे फेसबुकने सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळामध्ये फेसबुकने एकूण ५८३ मिलियन म्हणजे ५८.३ कोटी फेक अकाउंट्स बंद करण्यात आल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे. तसेच आपल्या ग्राहकांसाठीच्या नियमावालीमध्ये काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला असून यानुसार सामाजिक शांतता भंग होईल, असा कोणताही मजूकर ग्राहकांना या पुढे आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून शेअर करता येणार नाही. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फेसबुक ने म्हटले आहे.

केम्ब्रिज अनॅलिटीकने फेसबुकच्या ग्राहकांनाच डेटा लिक केल्यानंतर फेसबुकने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या पॉलिसी मध्ये अनेक नवे बद्दल करण्यास सुरुवात केली आहे. आपली सेवा अधिकाधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावी, म्हणून यापुढे फेसबुक प्रत्येक वर्षी दोन वेळा ट्रॅन्स्फरन्सी रिपोर्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपली सुरक्षा आणि फेसबुकच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@