कर्नाटक राज्यपालांविरोधात कॉंग्रेसचे देशव्यापी 'धरणे आंदोलन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |


नवी दिल्ली : बहुमत असताना देखील कॉंग्रेस आणि जेडीएसला डावलून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यामुळे कर्नाटक राज्यपालांविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून देशव्यापी धरणे आंदोलन पुकारले आहे. देशभरातील सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना याविषयी सूचना देण्यात आल्या असून उद्या देशात सर्वत्र कर्नाटक राज्यपालांविरोधात धरणे आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव अशोक गहलोट यांनी नुकताच याविषयी आदेश जारी केला असून देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि तालुका पातळीवर हे धरणे आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसकडे बहुमतापेक्षा देखील अधिक जागा असताना देखील राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राज्यपालांनी एकप्रकारे आपल्या पदाचा गैरवापर केला असून त्यांचे हे कृत्य अत्यंत असंवैधानिक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी पक्षाच्या सर्व सदस्यांनी या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे निर्देश पक्षाने दिले आहेत.



कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला सध्या आपल्या निर्णयामुळे चांगलेच अडचणीमध्ये आले आहेत. वाला यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत सध्या देशभरातील विरोध पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच वालांबरोबर इतर राज्यपालांवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या धरणे आंदोलनावर वाला काय प्रतिक्रिया देणार ? हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@