भाजप हुकुमशाहीचे राजकारण करते : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 
 
 

 
 
 
रायपुर : भारतीय जनता पक्ष हुकुमशाहीचे राजकारण करते आहे असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकमध्ये भाजपने जी राजकीय खेळी करून सत्ता स्थापन केली ते म्हणजे हुकुमशाहीचे राजकारण आहे असे दर्शवत आहे. भाजपनेहमी राजकीय खेळी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो असाही आरोप त्यांनी यावेळी लावला. 
 
 
 
 
सध्या भाजप राज्यघटनेवर घाला घालत असून कर्नाटकातील जेडीएसच्या आमदारांना भाजपने १०० कोटींचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असा आरोप राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. आजपर्यंत भाजपने उद्योगपती यांना कर्ज दिले मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज का दिले नाही असा सवाल राहुल गांधी यांनी मोदी यांना विचारला. 
 
 
 
कर्नाटकमध्ये काय घडले हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे आता हे युद्ध आपल्याला मिळून लढायचे आहे. सत्ताधारी शक्तींना आपल्याला कोणत्याही किंमतीवर जिंकू द्यायचे नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. सामान्य लोकांचे अधिकार आपल्याला त्यांना परत द्यायचे आहे आणि त्यांचे संरक्षण करायचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@