नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वयाने काम करण्याची गरज- जितेंद्र पापळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 
 

 
 
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न
 

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्हयातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठया नदया वाहत असून या सर्व मोठया नदयांवर मोठे धरण बांधलेले आहेत. पावसाळयात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. त्यामुळे या मुख्य नदयांना पूर येवून पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील गावामध्ये पाणी येण्याचा धोका निर्माण होते. अशावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत गाव, तालुका, जिल्हयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत केले.
 
 
यावर्षीच्या पावसाळयात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन तथा निर्देश करीत असतांना ते बोलत होते. 
 
 
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सादरीकरणाव्दारे जिल्हयातून वाहणा-या वैनगंगा, पैनगंगा, इरई व वर्धा नदीच्या पूरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होऊ शकते, अशा गावांची यादी यावेळी वाचून दाखविली. तेव्हा या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षीत व संरक्षीत ठेवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसाळयापूर्वी सर्व नगर परिषद क्षेत्रात व मोठया शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येवून नाले मोकळे करण्यात यावे. तसेच शहरातील धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटीस देवून ते घर खाली करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिका-यांना त्यांनी दिल्या. तसेच विद्युत, दूरध्वनी, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग व पशुसंवर्धन या विभागांनी आपल्या विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त करुन आपली यंत्रणा पावसाळयापूर्वी सुसज्ज ठेवण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@