प. बंगाल निवडणुका : तृणमूल कॉंग्रेस आघाडीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |



कोलकत्ता : नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकांच्या निकाल आज जाहीर झाले असून राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर पंचायत आणि ग्राम पंचायतींमध्ये ममता बनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने सर्वात अधिक जागा मिळवल्या असून राज्यात सर्वत्र तृणमूल पक्षच आघाडीवर आला आहे.  दरम्यान राज्यातील अवघ्या बोटांवर मोजण्या इतक्या जागांवर भाजप, कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला  विजय मिळवता आला आहे. 

आज सकाळी ८ वाजल्यापासून राज्यात सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राजवळ कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वेगळ्या वेळी प्रमाणे यावेळी कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बंगाल पोलीस करत होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील काही ठिकाणी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या घटनासमोर आल्या. दरम्यान संध्याकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतींमधील ९० टक्के तर जिल्हा पंचायतींमध्ये एकूण ८० टक्के जागांवर तृणमूल निवडून आले होते. 

गेल्या १४ तारीखेला बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले होते. यावेळी तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी राज्यात सर्वत्र हिंसाचार करत जाळपोळ केली होती. या हिंसाचारात एकूण १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच काही पत्रकार देखील गंभीररीत्या जखमी झाले होते. या घटनेनंतर अवघ्या देशभारातून ममता बनर्जी यांच्यावर टीका सुरु झाली होती. परंतु ममता यांनी या घटनेवर कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर चिंता व्यक्त करत न्याय व्यवस्थेने यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
@@AUTHORINFO_V1@@