येडीयुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
कर्नाटक : भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि जेडीएसच्या संकटात वाढ झाली आहे. काल बीएस येडीयुरप्पा यांनी राजभवनात कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई यांची भेट घेतली असून यावेळी येडीयुरप्पा यांनी १०४ आमदारांचे समर्थन पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले होते. 
 
 
 
त्यामुळे काँग्रेस आणि जनता दल या दोन पक्षांनी धर्मनिरपेक्ष पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि भाजप विरोधात सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसने याचिका दाखल केली. या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली असून या सुनावणीत बीएस येडीयुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
 
 
या खंडपीठात न्यायाधीश ए. के. सिकरी, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश शरद बोबडे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता कर्नाटकातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या सुनावणीनुसार आता येडीयुरप्पा आज सकाळी ९.३० वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून मात्र भाजपला ११२ आमदारांचे बहुमत येत्या १५ दिवसांमध्ये सिद्ध करावे लागणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@