थरूर यांची एका इंग्रज व्यक्तीने का मागितली माफी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |


 
 
ऑकलँड :  शशी थरूर यांचे नाव आज पर्यंत अनेकदा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिले आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांच्या निधनानंतर नुकतेच त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते, मात्र यावेळी त्यांचे नाव चर्चेत असण्यामागे एक वेगळे कारण आहे. ते म्हणजे त्यांची एका इंग्रज व्यक्तीने माफी मागितली आहे. आणि याचे कारण देखील खूप वेगळे आहे.
 
 
 
 
शशी थरूर ऑकलँड येथे लेखक संमेलनाला गेले असताना तेथे निमंत्रित सर्व लेखकांना ७ मिनिटाची एक कथा सांगायची होती, यावेळी थरूर यांनी भारतात घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेची म्हणजेच "जालियाँवाला बाग" हत्याकांडाची कथा सांगितली. त्यांच्या या कथेला तेथे मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली. त्यानंतर थरूर यांच्याकडे एका इंग्रज व्यक्तीने येवून एक चिट्ठी दिली. या चिट्ठीत त्या व्यक्तीने इंग्रज या नात्याने थरूर यांची एक भारतीय म्हणून माफी मागितली. या चिट्ठीत लिहीले होते, "मी एक इंग्रज आणि , आणि मी तुमची माफी मागतो."
 
 
ही घटना खूपच वेगळी घटना आहे. इंग्रजांने भारतावर राज्य केले, अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, इंग्रजांनी क्रूर कारवाया केल्या मात्र इतक्या वर्षांनंतर जालियाँवाला बागची कथा एकून एका इंग्रजाने येवून माफी मागणे खरंच एक वेगळी आणि भावनिक घटना आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@