२०१९ मध्ये सत्तेत आल्यावर आम्ही छत्तीगढ येथे शेतकरी कर्जमाफी करणार : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |

 
 
सुरगुजा (छत्तीसगढ) :  पंतप्रधानांनी उद्योजपतींचे कर्ज माफ केले, मात्र ते छत्तीसगढ येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास तयार का नाहीत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मी हा प्रश्न विचारुन देखील त्यांनी माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. आज छत्तीसगढ येथील सुरगुजा  येथे एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. २०१९ मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर छत्तीसगढ येथील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
 
 
 
 
कर्नाटक येथील निवडणुकांमध्ये नुकतीच हार पत्करल्यानंतर काँग्रेस पक्ष आता छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश येथील राज्याच्या निवडणुकींसाठी सज्ज झाले आहे. आज रायपुर येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 
 
 
५ वर्षांत आम्ही शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार :

छत्तीसगढ येथे शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य बदलण्यासाठी आम्ही सत्तेत येऊ. निवडणूक जिंकल्यावर आम्ही ५ वर्षांत शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
 
 
 
 
 
भाजपला समाजातील सर्व स्तरांचा विकास होवू द्यायचा नाहीये, त्यांना दलित, शेतकरी, आणि समाजातील शेवटच्या स्तराचा विकास होवू द्यायचा नाहीये, त्यासाठी आपल्याला मिळून छत्तीसगढमध्ये बदल करावा लागेल. एकत्र काम करणे आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@