बी.एस. येडीयुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
१५ दिवसांमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करावे लागणार 
 
 
कर्नाटक : आज सकाळी ९.३० वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ बी.एस. येडीयुरप्पा यांनी घेतली असून कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडीयुरप्पा यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. कर्नाटकातील राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. ७५ वर्षीय येडीयुरप्पा हे आता कर्नाटकचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. 
 
 
 
कर्नाटकातील राजकीय युद्धानंतर अखेर आज भारतीय जनता पक्षाचे सरकार कर्नाटकात सत्तारूढ झाले आहे. मात्र भाजपला येत्या १५ दिवसांमध्ये आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे भाजपला आता मतांची जुळवाजुळव करवू लागणार त्यामुळे आता भाजपला किती आमदार पाठिंबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येडीयुरप्पा यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता. 
 
 
 
त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली असून बी.एस. येडीयुरप्पा यांच्या शपथविधीला आम्ही स्थगिती देवू शकत नाही असे म्हटले. राजभवन येथे येडीयुरप्पा पोहोचताच सगळ्या कार्यकर्त्यांनी 'मोदी मोदी' अशा घोषणेने येडीयुरप्पा यांचे स्वागत केले. राजभवनात देखील सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@