कर्नाटकाच्या भूमीत 'कमळ'च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2018
Total Views |

येडीयुरप्पा यांना सत्तास्थापणेसाठी राज्यपालांचे निमंत्रण 




बेंगळूरू : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकाच्या भवितव्याच्या चर्चेला अखेरकार विराम मिळाला असून कर्नाटकाच्या भूमीमध्ये यापुढे कमळच फुलणार असल्याचे निश्चित झाले आहे. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे विजयी उमेदवार येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापण्यासाठी आमंत्रण दिले असून लवकरच शपथविधीची तारीख आणि वेळ कळवण्यात येईल, असे राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या 'हाता'तील आणखी एका राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यपाल वाला यांनी थोड्याच वेळापूर्वी येडीयुरप्पा यांना पत्र लिहून याविषयी सूचना दिली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये येडीयुरप्पा यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती झाली असल्याचे आपल्याला समजले आहे. तसेच येडीयुरप्पा यांनी केलेला सत्तास्थापनेचा दावा देखील आपल्याला मिळालेला असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. त्यामुळे येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आपण आमंत्रण देत असून लवकरच यासंबंधीच्या इतर सूचना दिल्या जातील, असे राज्यपालांनी म्हटले आहे.



दरम्यान कॉंग्रेस पक्षाने मात्र थोड्याच वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल वाला आणि भाजप पक्षावर टीका केली होती. कॉंग्रेस-जेडीएसकडे बहुमत असून देखील राज्यपाल कुमार स्वामी यांना सत्ता स्थापनेसाठी मुद्दाम निमंत्रण देत नाहीत, जेणेकडून भाजपला बहुमतासाठी राजकारण करता यावे, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. तसेच बहुमत असताना देखील जर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले तर या लोकशाही विरोधी कार्याविरोधात भाजप कडक पाऊले उचलेल, असा इशारा कॉंग्रेसने दिला होता. त्यामुळे राजपालांच्या या निर्णयावर कॉंग्रेस आणि विरोधक काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@