कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पिछाडीवर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

 
कर्नाटक निवडणूक निकालाची मतमोजणी सुरु आहे. यात कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे चामुंडेश्वरी आणि बादामी या दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत बादामी येथील भाजप उमेदवार श्रीरामाल्लू यांना मोठी आघाडी मिळालेली आहे. उत्तर कर्नाटकात असलेल्या बागलकोट जिल्ह्यातील बादामी मतदार संघातून सिद्धरामय्या लढत होते.
 
 
उत्तर कर्नाटक भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कुठलाही निकाल स्पष्ट झालेला नाही, त्यामुळे नेमकी परिस्थिती सांगता येणार नाही. सिद्धरामय्या हे चामुंडेश्वरीतून देखील पिछाडीवर आहेत, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
मध्य कर्नाटक, बंगळूरू शहर, उत्तर कर्नाटक येथे भाजप आघाडीवर असल्याचे चित्र सध्या आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा किनारपट्टीच्या प्रदेशात देखील भाजप मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या गोटात उत्साह दिसून येत आहे. मात्र अद्याप कुठलेही निकाल स्पष्ट झालेले नाहीत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@