कर्नाटक कुणाचे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

 
आज कर्नाटक निवडणूक निकाल जाहीर होत असल्यामुळे सगळ्यांची नजर निकालांच्या आकडेवारीवर लागलेली आहे. भाजप, कॉंग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) अशी तिरंगी लढत आहे. यात सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप ८८, काँग्रेस ७२ , जनता दल (सेक्युलर) २६ जागांवर आघाडीवर आहे.
 
 
भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे. काँग्रेस या निवडणुकीपासून पुनरागमन करणार आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी ही निवडणूक करो या मरो अशी झाली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसमुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या भाजपसाठी या राज्यातून देखील काँग्रेस शासन हद्दपार करण्यासाठीची ही संधी आहे.
 
 
भाजपाध्यक्ष अमित शाह, येडीयुरप्पा सहित अन्य भाजपनेते पूर्ण बहुमत मिळणार, यावर ठाम आहेत. त्याचबरोबर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील कॉंग्रेस बहुमत गाठेल यावर आश्वस्त आहेत. मात्र एक्झिट पोल अनेक ठिकाणी त्रिशंकू निकाल दर्शवित होते. सध्या तरी बहुमताची आघाडी कुठलाही पक्ष गाठू शकलेला नाही. त्यामुळे यात काय होते हे पाहणे औस्तुक्याचेठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@