लिंगायत समाज तोडण्याचा डाव काँग्रेससाठी आत्महत्या ठरला – सुब्रमण्यम स्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

 
 
जेव्हा काँग्रेसने लिंगायत समाजाला हिंदू समाजापासून तोडण्याचा डाव खेळला तेव्हाच मी म्हटलो होतो की काँग्रेस पक्ष आत्महत्या करत आहे म्हणून, असे वक्तव्य भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. लिंगायत मतांचा मोठा फटका काँग्रेसला या निवडणुकांमध्ये बसल्याचे दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान केले आहे.
 
 
माझे मित्र येडीयुरप्पा यांना लवकरच मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल असे देखील त्यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले आहे. मी निवडणुकांच्या आधी केलेला अंदाज खरा ठरला असून भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे, असे देखील त्यांनी लिहिले आहे. कर्नाटक निवडणुकीत सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील अनेक ठिकाणी प्रचार केला होता. विशेषतः माध्यमांमध्ये चर्चांसाठी ते जात असत, त्याचबरोबर त्यांच्या चर्चा देखील या दरम्यान लोकप्रिय ठरल्या आहेत.
 
 
 
सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस पक्षाला ७० जागांवर आघाडी मिळालेली आहे, तर भाजपला ११० जागांवर. यासोबतच भाजपने १ जागा जिंकली आहे. जनता दल सेक्युलरला ३९ ठिकाणी आघाडी मिळालेली दिसत आहे. यानुसार भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करणार, हे स्पष्ट होत आहे. आणि कॉंग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असा कल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@