वरिष्ठांची चर्चा करूनच अंतिम निर्णय घेऊ : येडीयुरप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |


बेंगळूरू : कर्नाटकच्या जनतेनी कॉंग्रेसला पूर्णपणे नाकारले असून भाजपला आपला कौल दिला आहे. परंतु पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि नेतृत्वांशी चर्चा करूनच भविष्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण भाजपचे विजयी उमेदवार आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिले आहे. बेंगळूरु येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.

'कर्नाटकच्या जनतेनी कॉंग्रेसला नाकारून कॉंग्रेसमुक्त कर्नाटकाच्या दिशेने पहिले पाउल टाकलेले आहे. परंतु तरीही कॉंग्रेस मागील दाराने सत्तेत येण्याच्या केविलवाना प्रयत्न करत आहे. पण कर्नाटकची जनता हे सर्व पाहत असून कॉंग्रेसचे हे प्रयत्न देखील ती हाणून पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या विजयानंतर भाजपची पुढील वाटचाल काय ? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी आणि शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करूनच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.



दरम्यान कॉंग्रेस पक्षाने देवीगौडा यांच्या जेडी(एस)ला सत्ता स्थापन करण्यासाठी आपला पाठींबा दर्शवला असून जेडी(एस)ने देखील कॉंग्रेसच्या प्रस्तावाचा स्वीकारला केला आहे. सत्तास्थापनेसाठी म्हणून थोड्याच वेळात कॉंग्रेस आणि जेडी(एस) कर्नाटक राज्यपालांची भेट घेऊन त्यांची चर्चा करणार आहे. दरम्यान सिद्धरामय्या यांनी देखील आपला राजीनामा राज्यपालांकडे जमा केलेला आहे.

@@AUTHORINFO_V1@@